भाईंदर : मिरा भाईंदर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दि. 17 एप्रिल पर्यंत कोरोना बाधितांची संख्या 59 वर पोचलेलीआ हे. त्यापैकी नयानगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण जास्त आढळून आलेलेआहेत. तरी सदर ठिकाणी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये व सोशल डिस्टसिंगचा वापर करताना घरीच रहावे यासाठी मा. आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये सामाजिक दुरीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये व लॉकडाऊनच्या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी नविन मोबाईल ॲप सुरु करण्यात आलेला आहे.
सदर मोबाईल ॲपचा वापर नयानगर परिसरात जास्त कोरोना बाधित रुग्ण असल्यामुळे तेथे आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे.
नयानगर परिसरात होणारी नागरिकांची गर्दी व वाढते कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी नागरिकांना घरच्या घरीच जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, औषधे, दूध इत्यादी Home Delivery व्दारे उपलब्ध होण्याकरिता मिरा भाईंदर महानगरपालिकेने केंद्र व राज्य शासन निर्णयानुसार कोविड-19 या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, औषधे, दूध मिळण्याकरिता मोबाईल ॲप व्दारे वस्तूंची खरेदी करण्याकरिता त्या परिसरातील दूकानदार व नागरिकांचा संपर्क होणे हेतू MBMC Home Delivery या नावाने मोबाईल ॲप सुरु केलेला आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका नयानगर परिसरातील नागरिकांनी MBMC Home Delivery या ॲपचा लाभ घेण्याकरिता,
1) मोबाईल मध्ये Google Play Store वरुन MBMC Home Delivery हा ॲप Install करावा.
2) सदर ॲप मध्ये Buyer हा पर्याय निवडावा.
3) हा पर्याय निवडल्यानंतर परिसरातील किराणा सामान विक्रेत्यांची यादी दिसेल.
4) त्यापैकी एका दुकानाची निवड करण्याकरिता Click करावे.
5) Click केल्यानंतर त्या दुकानात उपलब्ध असलेल्या सामानांची यादी येईल. त्या यादीमधील आवश्यक सामान व आवश्यक Quantity ची नोंद करावी.
6) त्यानंतर ते सामान (बिलासह) संबंधितास घरपोच Delivery करण्यात येईल.
तर परिसरातील दुकानदारांनी सुध्दा Google Play Store मध्ये जाऊन विक्रेता (Seller) पर्याय Install करावा. नागरिकांना व दुकानदारांना ॲप Install करताना तांत्रिक अडचणी आल्यास श्री. रुपेश सुळे, 9657430291 व श्री दुर्वांक म्हात्रे 9892376517 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. तसेच या ॲपचा उपयोग करताना नागरिकांनी तसेच दुकानदारांनी आपल्या सोसायटीमधील नियमांचे पालन करुन सोशल डिस्टसिंगचा वापर करावा व
महानगरपालिकेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी करावी. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर न पडता या ॲपचा वापर करुन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी असे मा. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी जाहिर आवाहन प्रसिध्द पत्राद्वारे केले आहे.