मिरारोड : येथील क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असतांना हाटकेश येथील मंगल नगरच्या फळ - भाजीबाजारात लोकडाऊन च्या नियमाचे सऱ्हासपणे उल्लंघन करून गर्दी करताना दिसून येत असून सोशल डिस्टनला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे या ठिकाण ना एक पोलीस आहे किंव्हा ना मनपा कर्मचारी व अधिकारी आहे. या प्रकारावर पोलीस प्रशासन किंव्हा मनपा प्रशासन कोणतीच पाऊले उचलत नसून प्रशासनाची उदासीनता दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई / भाजीपाला बाजार/ फळबाजार व सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने पूर्वी दिले होते. हे आदेश दिनांक 15 एप्रिल पासुन संपुष्टात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर दिल्यानंतर संबंधीत महानगरपालिका / नगरपालिका / नगर पंचायत यांचे कार्यक्षेत्रातील प्रभाग (वार्ड) निहाय लोकसंख्या लक्षात घेऊन फळे / भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण (जो शहरात एकाच ठिकाणी भरतो त्याऐवजी तो शहरातील प्रभागानुसार किंवा दोन प्रभागासाठी एका ठिकाणी) करावे व अनावश्यक गर्दी टाळावी. त्या ठिकाणी घावूक व्यापारी हे किरकोळ विक्रेत्यांना विक्री करु शकतील. सहकार विभागाने (श्री. शहाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक यांनी सोसायटीची एकत्रित मागणी घेऊन घाऊक दुकानदार यांचेमार्फत आवश्यकतेनुसार सोसायटी / इमारती मध्ये थेट पुरवठा होणेसाठी नियोजन व कार्यवाही करावी.
भाजीपाला बाजार / फळबाजार व सर्व फळे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण व्यवस्था (Supply Chain) सुरळीत राहील यासाठी प्रत्येक महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत यांनी त्यांचे स्तरावर एक नोडल अधिकारी नेमावा. या नोडल अधिकाऱ्यानी उपरोक्त नमूद प्रमाणानुसार व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही करावी असे आदेश असतांना प्रशासन आदेशाची अंमलबजावणी प्रभाविपणे करत नाहीत असेच दिसून येते. स्थानिक नगरसेवक संजय थरथर, अनिता मुखर्जी, रुपाली शिंदे हे देखील प्रभागात दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.