औरंगाबाद : विपश्यना एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टचे अध्यक्ष, औरंगाबाद येथील सुजाता आणि मैत्री बुद्ध विहाराची तसेच मुंबईतील नालंदा व तथागत बुध्द विहाराची धुरा सांभाळणारे भन्ते करुणानंद थेरो हे धम्म कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सातत्याने पुढाकार घेत असतात. सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या संकटातही ते उपेक्षित, वंचित घटकांच्या मदतीला धावून आले आहेत. भन्तेजींनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उपासकांना मदतीचे आवाहन केले. उपासकांनीही गरजूंसाठी जिवनावश्यक वस्तूंची भरभरून मदत केली. भन्ते करुणानंद थेरो आणि त्यांचे सहकारी मिळालेली ही मदत प्राधान्याने भटक्या विमुक्त कुटुंबांच्या पालावर, स्मशानजोगींना स्मशानात जाऊन पोहचवित आहेत. झोपडपट्टीतील रहिवाशांनाही याचा लाभ मिळत आहे. भन्ते करुणानंद थेरो यांनी तथागत गौतम बुद्धांचा करुणा आणि मैत्रीभाव आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केल्याचे मत जणसामान्य व्यक्त करीत आहेत.
भन्ते करुणानंद थेरो यांचा कोरोनाविरोधी लढाईत मदतीचा हात
• Rajesh jadhav