कोरोनाच्या संकटात शंकर नारायण महाविद्यालयात रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम

भाईंदर दि.3 (प्रतिनिधी): कोरोनाच्या संकटाने रक्ताचा तुटवडा भासत असतांना आज येथील शंकर नारायण महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापक आणि सुजाण नागरिक सर्व सरकारी निर्देशांचे पालन करत, एकमेकांत सुरक्षित सामाजिक अंतर राखून सर्वनी कोरोना विरोधातील लढाईमध्ये रक्तदानाच्या माध्यमातून या सर्वानी ह्या लढ्यात आपले योगदान दिले. 
महाविद्यालय आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेची भारतरत्न राजीव गांधी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शंकर नारायण ट्रस्ट चे अध्यक्ष तसेच मीरा भाईंदर मनपा चे सभागृह नेते रोहिदास पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला गेला. या बाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, जागतिक संकट असलेला कोविड -१९ आणि करोना व्हायरस मिरभाईंदर साठी सुद्धा तितकाच आव्हानात्मक आहे. घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसली तरी अधिक रक्तसाठा असणे आवश्यक आहे. त्यातूनच या लॉकडाऊन च्या परिस्थितीत सुद्धा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून योग्य पूर्वनियोजन यांच्या बळावर येथे ४३ युनिट रक्त जमा करण्यात आले. महाविद्यालयाच्या NSS, NCC ह्या विभागांनी तसेच प्रवीण पाटील तंत्रनिकेतन, रोहिदास पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या सहकारी संस्थांनी सुद्धा उपक्रमात सहभाग नोंदवला. 
कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिल्या बद्दल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. प्राचार्य डॉ यादव, रंजना पाटील, सचिव महेश म्हात्रे, हितेंद्र पाटील, सुबोध पाटील, प्रा सुनील धापसे, प्रा अमोल बाविस्कर, सह शिक्षक निमेश पाटील या सर्व टीम चे त्यांनी कौतुक केले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात या उपक्रमाच्या माध्यमातून आपला कोरोना विरुद्ध चा संघर्ष यशस्वी होईल यात शंका नाही असा आशावाद सर्व रक्तदात्यानी व्यक्त केला.