"एक हात मदतीचा, नायनाट करूया कोरोनाचा" या विचाराने प्रेरित राहुल सुभेदार यांचे कौतुकास्पद सामाजिक कार्य

मुंबई : कोरोनच्या संकटाने लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांचे रोजगाराचे मार्ग बंद झाले. हातांवर पोट असणाऱ्यांकडे पैसाच नसेल तर खायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या संकटात डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, वीजपुरवठा कर्मचारी, शासन प्रशासन सर्वजन आपापले योगदान देत आहेत. अश्या वेळी आपण सुद्धा समाजाचे घटक आहोत, आपणही शक्य तशा प्रकारची मदत करायला हवी या सामाजिक बांधिलकीतून "एक हात मदतीचा, नायनाट करूया कोरोनाचा" या विचाराने प्रेरित होऊन मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते राहुल सुभेदार त्यांच्या सहका-यांसह मढ मलाड पश्चिम येथील कुटुंबांना सामाजिक बांधिलकीतून अन्यधान्याचे मोफत वाटप केले. तसेच यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सार्वजनिकरित्या साजरी करता येणार नाही. परंतु त्यांच्या विचारांना प्रमाण मानून अनेक गरजू कुटुंबांना शक्य तेवढी मदत करूया आणि एक वेगळी भीमजयंती साजरी करूया असे आवाहन राहुल सुभेदार यांनी केले आहे. या कार्यासाठी अरविंद कांबळे, राजेश गवई, मंगेश जोगतळे आदि समाजसेवकांनी सहकार्य केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.