डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रज्ञावंत 2020 ह्या ऑनलाईन प्रश्नोत्तर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

भाईंदर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती 14 एप्रिल रोजी देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरी होत असते. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट जगावर आल्याने यावर्षी प्रज्ञासूर्याची जयंती एका अभिनव उपक्रमाने साजरी करूया असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोशिएशन (BATA) व भीमबाणा युट्युब चॅनल मिरा - भाईंदर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रज्ञावंत 2020 ह्या ऑनलाईन प्रश्नोत्तर स्पर्धेचे आयोजन करून करण्यात आले होते त्यानुसार 13 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते त्याला राज्यातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रा. उत्तम भगत, किर्ती लाखण, प्रा. भास्कर पैठणकर, प्रा. सुनील धापसे व राजेश जाधव यांनी दिली. ही ऑनलाईन स्पर्धा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या म्हणजे 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार असून या स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे 2020 रोजी जाहिर करण्यात येणार आहे. यशस्वी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ २ बक्षीसे अनुक्रमे रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० व रु. ५०० च्या रोख रक्कमेसह प्रमाणपत्र देण्यात येतील अशी माहिती दिली. या अभिनव उपक्रमाची सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.