मिरा भाईंदर मध्ये आय. सी. यु. चे 20 बेड वॅटीलेटरसह वैद्यकीय सेवा सुरु - महापौर ज्योत्स्ना हसनाळे

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 ची वाढती संख्या लक्षात घेता आज सोमवार 13 एप्रिल पासून पं. भीमसेन जोशी रुग्णालय (टेंभा रुग्णालय) येथे आय. सी. यु. चे 20 बेड वॅटीलेटरसह वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली. यावेळी मनपाच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्यासह मिरा भाईंदर च्या आमदार गीता भरत जैन, आयुक्त चंद्रकांत हांडे, उपमहापौर हसमुख गेहलोत, आरोग्य विभागाचे उपायुक्त संभाजी पानपट्टे तसेच भक्तिवेदांत रुग्णालयाचे डॉ. अजय संखे आणि त्यांचे संपूर्ण डॉक्टर पथक उपस्थित होते.


वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून शहरात आयुक्तांनी संचारबंदी कडक केली असून नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.