भाईंदर : मिरा भाईंदर क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर करावयाच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणुन दि.01/04/2020 पासून मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पंडित भिमसेन जोशी रुग्णालय (टेभा रुग्णालय) हे कोविड हॉस्पीटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर ठिकाणी 100 खाटा उपलब्ध असून त्यापैकी 20 खाटांमध्ये व्हेंटीलेटर सह आयसीयुची सेवा उपलब्ध करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये सध्या 38 कोरोना बाधित रुग्ण व 13 संशयित रुग्ण असे एकूण 51 रुग्ण आहेत. सध्या अतिदक्षता विभागामध्ये एकही रुग्ण नाही.
मिरा भाईंदर शहरातील रुग्णालये कोविड व्यतिरिक्त इतर आजारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल करत नसल्याबाबत तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त होत होत्या व या रुग्णांना खात्रीशीररित्या रुग्णालय उपलब्ध व्हावे, यासाठी सदर तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त यांनी फॅमिली केअर हॉस्पीटल, गोल्डन नेस्ट फेस 1, मिरारोड (पूर्व) हे Non Covid हॉस्पीटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोविड-19 (कोरोना) ची लक्षणे प्रथमदर्शनी
न दिसून येणाऱ्या तसेच कोविड-19 व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्तअसणाऱ्या रुग्णांना या (फॅमिली केअर) हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येऊ शकेल.
या रुग्णालयात 4 Modular OT, 25 beds ICU, 6 beds NICU, Cath lab for coronary angio, Angioplasty, DSA, Perma cath, Pacemaker, AV fistula, X-ray, Path lab Computerised Biochemistry, Microbiology,
Pathology, Hormone studies, ABG इत्यादी Physiotherapy, Dental, ENT, Gastro, Paediatric, OBGY, Urology, cardiology, Cardiac surgery, Neuro Surgeries, Oncosurgery, Physicians, Surgeons, Plastic Surgeon, Intensivist, Haematology, Dialysis 7 machines, Genral ward, Male-Female, 6 Consulting rooms, AC wards, Deluxe rooms, Triple sharring, Twin sharring, Ultrasonography, 2D Echo, casualty, Canteen व इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात रुग्णांसाठी 100 बेड उपलब्ध आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य,रुग्णासाठी औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेले आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाने प्रसिद्ध पत्राद्वारे दिली आहे.
मिरा भाईंदर शहरातील नागरिकांनी कोविड व्यतिरिक्त वैद्यकीय सेवेसाठी सदर रुग्णालयाशी 7777000849 या संपर्क क्रमांक संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.