कोरोना व्हायरस बाबत घाबरू नका प्रशासन सज्ज आहे - चंद्रकांत डांगे आयुक्त मनपा.

भाईंदर- कोरोना व्हायरस बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून , ठाणे जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी काही लक्षण दिसली तर कृपया घराबाहेर निघू नये, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा , कुटुंबातील इतरांना आपल्यामुळं काही होऊ नये, यासाठी एक मीटरच्या अंतरावरूनच बोलाव, आज कोणत्याही व्यक्तीला मास्क घालुन फिरण्याची गरज नाही. नागरिकांनी अतिरिक्त प्रवास टाळावा , गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये , लग्नसमारंभासाठी जास्तीची गर्दी करणं टाळावं , सप्ताह जाणे टाळावे, यदाकदाचित जर काही प्रसंग उद्भवला तर जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज पत्रकाद्वारे दिली. पुढे ते म्हणाले, मिरा भाईंदर उपआयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांची सहनियंत्रण अधिकारी व डॉ.प्रमोद पडवळ यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणू बाबत माहितीकरिता राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020- 26127394 व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91- 11- 2397846 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच सविस्तर माहिती साठी टोल फ्री क्रं. 104 कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी न घाबरता कोरोना विषाणू संसर्गजन्य होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे पालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.