सर्व दुकाने आस्थापना पुढील आदेशापर्यत बंद

ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना [अत्यावश्यक किराणा सामान ( GROCERY), दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय (CHEMIST SHOP) वगळून] तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप [ हॉटेल्समधील टेक अवे/ पार्सल (घरी जेवन घेऊन जाणे) सर्व्हीस वगळून] दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच जी किराणामालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच नागरिकांकरिता हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी दिल्या आहेत.