मिरा भाईंदर मनपा आरोग्य विभाग झोपेत

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ सुंदर, मिरा भाईंदरचा नारा देत स्वच्छ सर्वेक्षण अभियान मोठा गाजावाजा करत संपुर्ण राबविले जात असतांना त्या अंतर्गत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी करोडो रुपये खर्चही केला जातो. अनेक जनजागती मोहिम राबविल्या जातात परंतु हे स्वच्छतेचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांना लाग असून बिल्डरांना मात्र हे नियम लागु नसल्याचे दिसून येत आहे. बिल्डर स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे घाणीचे ढिग टाकत आहेत. विशेष म्हणजे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच सर्वे नं. २१६ मौजे भाईंदर येथे महात्मा रोसिडेंन्सी या नियोजित इमारतीचे बांधकाम रामेश्वर इंटरप्राइजेस हा विकासक करत असून इमारत फाईलिंग करण्याचे काम सुरु आहे. हे काम करतांना निर्माण होणारा मलबा विकासकाने नष्ट करणे अपेक्षित असतांना तसे न करता मुख्य रस्त्यावर प्रत्येक चेंबरच्या झाकणाजवळ कचऱ्याचा ढिग टाकला आते त्यामुळे रस्त्यावरच ऐन हिवाळामध्ये नाले सफाई केल्याचे चित्र विकासक रंगवू पाहत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत असून रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरून सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या घटनेला पाच ते सहा दिवस होऊन गेले तरीही मनपाआरोग्य विभाग झापत असल्यान या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केले गेले. याबाबत स्थानिक रहिवाशांनी मनपाकडे तक्रार करुन देखील संबंधित बिल्डरवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे स्वच्छ अभियानाअंतर्गत स्वच्छतेची मोहिम राबवत असतांना दुसरीकडे अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचा ढिग टाकून अस्वच्छ मिरा भाईंदर होत असतांना प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रशासनाची उदासिनताच दिसून येत आहे. स्वच्छतेबाबत सर्वसामान्यांना वेगळी वागणूक वश्रीमंत बिल्डरांना वेगळी वागणूक प्रशासनाकडून दिली जात असल्याचे दिसून येते. स्वच्छ सुंदर मिरा भाईंदरचा नारा फक्त कागदावरच दिसून येत असून यातुन प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचा ढिग टाकणाऱ्या विकासकावर कोणती कारवाई कारवाई होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.