आज सोशल मीडियाच्या जगामध्ये क्षणातच एकादा हिरो होतो आणि एखादा झिरोही होऊन जातो.या माध्यमाचा उपयोग करतांना गरज आहे ती नितीमत्तेच्या शिकवणेची. कोणती गोष्ट चांगली व कोणती गोष्ट वाईट, कोणत्या गोष्टाचा परिणाम सकारात्मक होईल व कोणत्या गोष्टीचा परिणाम नकारात्मक होईल याचे मुल्यमापन करणे काळाची गरज आहे. सोशल माध्यमाच्या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून मिळणारे अर्थकारण यासाठी सोशल मीडियामध्येजणू स्पर्धा असल्याचे दिसून येते. बदनामी झाली तर काय बिघडले? नाव तर गाजलेना?अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि आजकाल समाजजीवनात तशी ख्याती वा प्रसिद्धी मिळवण्याचे एक तंत्र विकसित होताना दिसत आहे. मजलीस नावाच्या पक्षाचे माजी आमदार व नेते वारिस पठाण यांनी केलेले वादग्रस्त विधान किंवा बंगलोर येथील एका कार्यक्रमात अमुल्या नावाच्या तरुणीने दिलेल्या देशविरोधी घोषणा सनसनाटी माजवून गेल्या. त्यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नसती, तर त्यांना किती लोक ओळखूशकले असते? आज त्यांची नावे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत आणि हळूहळू तत्सम मंडळी त्यांना अगत्याने मुद्दाम खळबळ माजवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आमंत्रण द्यायला पुढे सरसावतील.वर्षानुवर्षे अशा तक्रारी वा गुन्ह्याचे खटले चालून त्यांना दोषी ठरवण्यात कायदा व न्यायालयीन यंत्रणा तोकड्या पडत आहेत. मग, साधले काय, याचा विचार करणे आवश्यक नाही काय? यापैकी अमुल्या नावाच्या मुलीने त्या घोषणा दिल्या, तेव्हा असदुद्दीन ओवैसीदेखील गडबडून गेले. त्याच चित्रणामध्ये त्यांची अस्वस्थता दिसून येते. आपल्या आसनाकडे जाणारे ओवैसी तत्काळ मागे फिरले आणि त्यांनी त्या मुलीच्या हातातूनध्वनिवर्धक हिसकावून घेण्याचा व तिला रोखण्याचा प्रयत्न केला असे दिसते; पण त्यांच्यावरही दोषारोप करणारे हीवस्तुस्थिती नजरेआड करून प्रतिक्रिया देतात, तेव्हा तेही सारखेच दोषी असतात; पण त्यापेक्षा त्याच मुलीचा दुसरा एक व्हिडीओ महत्त्वाचा आहे. त्यात ती म्हणते,असे काही मला म्हणायचे असते असे अजिबात नाही. मी बोलते वा घोषणा देते. त्या उत्स्फूर्त नसतात. त्यामागे कार्यरत असलेली एक मोठी व्यापक संघटना आहे. तिथे असे शब्द किंवा वाक्ये घोषणा ठरवल्या जातात आणि माझ्यासारखे फक्त जमावासमोर जाऊन उभे राहतात. आम्ही चेहरा असतो; पण |खरी यंत्रणा पडद्यामागे काम करीत असते. अमुल्याच्या त्या व्हिडाआतील निवदन धक्कादायक आहे. कारण, वरकरणी तिने पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या वा भारतविरोधी घोषणा |दिल्याचा गवगवा खूप झाला; पणअशारीतीने मुलांचा, विद्यार्थ्यांचा किंवा निरागस लोकांचा देशविरोधी भूमिकेत किती पद्धतशीरपणे वापर होत आहे, ते गुलदस्त्यात राहिलेले आहे. जेव्हा अशीच | प्रसिद्धी मिळते व त्यातून नवे देशविरोधी चेहरे प्रकाशझोतात आणले जातात, तेव्हा त्यांना सर्वप्रकारे सहाय्य करून घातपाती कारस्थाने राबवणाऱ्यांना हातभार लावला जात असतो. त्यांच्या तोंडून विघातक विधाने वा शब्द उच्चारून घेतले जातात आणि समाजातील नाराजांना चिथावण्या देण्याला चालना मिळत असते. आपल्याही मनात असलेली खदखद बाहेर काढण्याची हिंमत सुप्तावस्थेतील नाराजांना मिळू शकते आणि चिथावणी देणाऱ्या गुप्त कारस्थानी संस्था त्यांनाच शोधत असतात. खरे गुन्हेगार। त्या संस्था व संघटना असतात आणि कारवाईचा बडगा अशा लोकांच्या विरोधात उगारला जात असतो; पण ते नुसता चेहरा नव्हे, तर मुखवटा असतात आणि त्यामागे असलेला खरा चेहरा लपून राहतो. त्याचा शोध घेतला जात नाही वा त्यांना हातही लावला जात नाही. ते मोकाट राहतात आणि नवनवे चेहरे पुढे करीत असतात. म्हणूनच कितीही प्रक्षोभक वाटलेल्या घोषणा वा शब्दांना प्रसिद्धी देण्यापूर्वी माध्यमांनी व त्यावर प्रतिक्रिया देण्यास उतावीळ झालेल्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तो एक सापळा आहे. ती नुसती ठिणगी आहे. ती पसरण्याला हातभार लावणे घातक असते. अशा शब्दांची माहिती वा तक्रार तपास यंत्रणांकडे सोपवण्याला प्राधान्य असले पाहिजे. त्यातून आगडोंब निर्माण करू बघणाऱ्यांना मदत होणार नाही, याची काळजी घेणे अधिक देशप्रेम असू शकते. देशाविषयीची आस्था नुसत्या शब्दात किंवा निषेधात नसते, तर परिणामकारक सावधानतेमध्ये असते. त्यामुळे एखादी घटना प्रसिद्ध करतांना होणारा फायदा तोटा याचेही अवलोकन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते न करता कोणतीही गोष्ट करणे हे धोखादायक ठरु शकते.
सोशल माध्यम शाप की वरदान
• Rajesh jadhav