लोवले ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी घेतला निर्णय 
संगमेश्वर (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोवले ग्रामपंचायतची होणारी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला आहे. लोवले गाव हे मुंबई गोवा-कोल्हापूर रोडवर असून तालुक्याचे गाव म्हणून ओळखले जाते त्यामुळे या गावाला भोगौलिक व राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. 
गेले पंधरा वर्ष एकाधिकारपणाने सत्ता चालवणारे विद्यमान सरपंच चंद्रकांत चव्हाण यांनी कोणताही विकास न करता फक्त अनेक वर्गाला उपेक्षित ठेवण्याचे काम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. लोवले बौद्ध वाडीला मागील बारा वर्ष विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते त्यामुळे जागृत नागरिकानी वारंवार ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करून अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम करण्यात आले. ते कामही निकृष्ट दर्जाचे करून मोठ्याप्रमाणात भ्रष्टचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून संपूर्ण गावामध्ये पाणी टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. नवीन ग्रामपंचायत इमारतीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले त्यात काटकसर करून गावातील अनेक समस्या दूर करता आल्या असत्या असे ग्रामस्थ मत व्यक्त करत आहेत. डोंगर भागात आजही नागरिकांना मोठया समस्यांना सामोरे जावे लागत असून विद्यार्थांना शाळा दूर असल्याने शिक्षांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच चंद्रकांत चव्हाण यांच्यावर ग्रामस्थ नाराज असल्याने स्थानिक आमदार उदय सामंत यांचीही भेट घेऊन ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही निवडणूक गाव पॅनल उभे करून सर्व ग्रामस्थ बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक यांनी पुढाकार घेऊन सत्ता सपांदन करण्याच्या निर्धाराने सर्व ग्रामस्थ कामाला लागले आहेत अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.