भाजपाचे नेते नरेंद्र मेहता यांचा तडकाफडकी राजीनामा

भाईंदर (प्रतिनिधी) भाजपाचे नेते आणि मीरा भाईंदर मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी तडकाफडकी पक्षाच्या पदाचा राजीमाना दिलासर्व पदांचा राजीनामा दिल्यानं भाजपाला आणखी एक धक्का मिळाला आहे. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणुक बुधवारी २६ पेबवारीमध्ये होत असतांना महापौर पदाच्या उमेदवारीवरुन खडाजंगी पक्षांतर्गत झाल्याने नाराज उमेदवाऱ्यांनी सोशल माध्यमांवर मेहतांची बदनामी करणारी पोस्ट वायरल केल्याच्या कारणाने नाराज होऊन नरेंद्र मेहता यांनी राजकीय सन्यास घेतल्याचे . बोलले जात आहे. आमदारकीचा पराभव झाल्यानंतर मिरा भाईंदरमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कांग्रेस यांनी एकत्रित येऊन - भाजपा सत्तेतून पायउतार करण्याची व्यूवरचना आखत भाजपाला राजकीय धक्के बसू लागले आहेत. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना चार नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपात आलेले आणखी सहा आमदार राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा आहे. त्यात भाजपाचे नेते नरेंद्र मेहता यांनीही पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेहता यांनी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आमदार गीता जैन यांनी त्यांचा पराभव केला होता.