भगत'वाणी

धोकेबाजी...


केवळ सत्ता म्हणून तुमची नाही चालणार धोकेबाजी


मोडून काढू पुन्हा एकिने आम्ही तुमची धोकेबाजी


 


आजवरील निवडणुकांचे चाळून बघा घोषणापत्र


अशीच तुम्ही चालवत आलात आमच्या सोबतधोकेबाजी


 


आम्ही कसतोआम्ही खातो, न कसताही तुम्हास देतो


खपवून घ्यावी का सांगा मग,अशीच आम्ही धोकेबाजी?


 


बोलणाऱ्यांची तोंडे दाबा, लिहिणाऱ्याची बोटे छाटा


बेमालूमच करत आलात लोकशाहीशी धोकेबाजी


 


काय शिकावे, किती शिकावे, तेही तुम्हीच सांगावे?


विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याशी हवी कशाला धोकेबाजी?


 


जात, धर्माच्या संपत्तीवर इमले रचता सत्तेचे


इथेच तुम्ही सुरू करता माणुसकीशी धोकेबाजी...


 


प्रा. उत्तम भगत, मुंबई मो.९३२२२८२०५६