भगत'वाणी'
रमाई
कितीही झालाे मोठा, कितीही केली कमाई
कसे विसरु तुला ग त्यागमाता रमाई ?
तुझ्यामुळेच बाबा अन तुमच्यामुळेच आम्ही,
कसे ग होऊ आम्ही तुझे उत्तराई ?
देश-समाज सांधण्या साहेबांचे नित्य भ्रमण
तुही कधी न केलीस त्यांना कसलीच मनाई !
लगेच काढून दिलेस अंगावरिल दागीने
वसतिगृहातील मुले जेंव्हा रडत भुकेच्या पाई !
रमेश, गंगाधर, इंदुही अकालीच गेले
तरीही धिटाइने केलीस काळावर चढाई ।
नवरा 'साहेब' तरी तुला न् कसला बड़ेजाव
साधेपणानेच तुला देशाची बनवले आई !
- प्रा. उत्तम भगत, मुंबई
भ्र.९३२२२८२०५६