बियरबार लॉजिंगच्या नगरीमध्ये आता बियर उत्पादन कंपनीही

कुठं नेऊन ठेवला आहे मिरा भाईंदर, सामान्य नागरिकांची खंत


पालिकेच्या क्षेत्रामध्यबिंदर मिरारोड :मिरा भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये बियर बार, ऑर्केस्ट्रा बार, लॉजिंग मोठ्या संख्येने निर्माण होत असतांना जणू मिरा भाईंदर बार लॉजिंगचे माहेरघर होत असल्याचे दिसून येत असतांना एवढ्यावरच न थांबता आता मिरारोडमध्ये चक्क बियर उत्पादनाची कंपनीच पेणकरपाडा येथे निर्माण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कंपनीचा भागीदार मालक मिरा भाईंदर महानगरपालिकेचा नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुठं नेऊन ठेवला आहे मिरा भाईंदर अशी खंत सामान्य नागरिक व्यक्त करत असून सर्वत्र संतापाची लाट पसरत आहे. तर दुसरीकडे महासभेत शिवसेनेने महाविकास आघाडीतील काँग्रेसची साथ सोडून चक्कभाजपाने आणलेल्या एका बार - लॉज व्यावसायीकासाठी पाठिंबा दिला . सत्ताधारी भाजपने पालिका उद्यानाच्या आरक्षणातुन बार - लॉज व्यावसायिकाचे बांधकाम वगळण्याचा ठराव आणला होता त्याला पाठिंबा देऊन .. सेनेने मतदान केले .दरम्यान आमदार गीता जैन सहभाजपाचे उपमहापौर चंद्रकांत वैती व काही भाजपा-सेनेच्या नगरसेवकांनी मात्र या विरोधातभुमिका घेतल्याने भाजपा सह सेनेला देखील घरचा अहेर मिळाला आहे. विशेष म्हणजेभाजपाच्या महापौर डिंपल मेहता आणि तत्कालिन आमदार नरेंद्र मेहतांनी शिवसेनेसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे संस्कार काढले होते. शिवसेना मुळापासून संपवणार असेही म्हटले होते . मीरारोडच्या हटकेश - मंगलनगर जवळ महापालिकेचे व आरक्षण क्रमांक ३०५ हे उद्याना साठी आहे. या आरक्षणाच्या मुख्य दर्शनी कोपऱ्यावर एक मजली बांधकाम असुन ते क्षेत्र हॉटेल साठी वगळण्याची मागणी बार - लॉज व्यवसायीक संतोष पुत्रण यांनी ही बोली ला एटा महापौरांनी महासभेत आणला  होता.