ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरामध्ये एसडी पेपर, चरस तसेच मेफेड्रॉन आदीअमली पदार्थांचा एक कोटी १३ लाख ४० हजार २७८ रुपयांचाअमली पदार्थहस्तगत केला. त्याची तस्करी करणाऱ्या ७६ तस्करांनाअटक केली आहे. संपूर्ण आयुक्तालयाच्या विविध पथकांनी मिळून एककोटी ७६ लाख १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाआहे. यात १९१ गुन्ह्यांमध्ये २८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून वर्षभर नियमित कारवाया करण्यात येतात. अनेकदा मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तर प्रदेश येथून मुंब्रा, भिवंडी,अंबरनाथ, कल्याणमधील दुर्गाडी परिसर आणि ठाण्यातील येऊर- उपवन आदी भागांमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे आढळले आहे. दोन वर्षांपूर्वी पोखरण रोडवर एमडी पावडरची तस्करी करताना मिळालेल्या दोन तरुणांच्या चौकशीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापूरच्या एमआयडीसीत छापा टाकून इफेड्रीनचा मोठा साठाच हस्तगत केला होता. गेल्या वर्षभरात पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून २०१९ मध्ये १९ लाख ९२ हजार ३५० रुपयांचा सुमारे ८५ किलो गांजा हस्तगत केला. यात पाच गुन्ह्यांमध्ये सात जणांना अटक केली. एलएसडी या नवीन अमली पदार्थाची तस्करी करणाच्या सात जणांना अटक केली. एका कारवाईमध्ये एकाकडून २३ एलएसडी पेपर आणि ९७० ग्रॅम चरस असा तीन लाख ९५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसऱ्या छाप्यात पाच आरोपींकडून १०६३ एलएसडी पेपर, ५८ ग्रॅम एमडी पावडर आणि ६.४ ग्रॅम चरस असा ६२ लाख ८१ हजार ६४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. तिघांकडून १२ ग्रॅम एमडीआणि १९ ग्रॅम केटामाइनअसा एकलाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय,१४ जणांकडून २१ लाख ५३ हजार ३०८ रुपयांचा गुटखाही या पथकाने जप्त केला. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १०२ गुन्हे दाखल झाले. यात १७९ आरोपींना अटक झाली. त्यांच्याकडून तीन कोटी ३२ लाख ८१ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यात एक कोटी ४५ लाखांच्या पाच किलो स्युडो इफेडीन, २० लाख ३० हजारांच्या मेफेड्रॉनचाही समावेश होता.
ठाणे पोलिसांनी वर्षभरात हस्तगत केले एक कोटी १३ लाखांचे अमली पदार्थ
• Rajesh jadhav