करोना वायरसनी चीनमध्ये हाहाकार मांडला असतांना शहरांचा वेग मंदावला आहे आणि लोक एकमेकांपासून विलग झाले आहेत. हे संक्रमण रोखण्यासाठी कदाचित आतापर्यंतचे सर्वाधिक प्रयत्न केले जात आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी, तर या प्रयत्नांना विषाणूविरुद्ध जनतेची लढाई असेच संबोधले आहे. परंतु, चिंताजनक सवाल असा, की एका महिन्यात या विषाणूमुळे सुमारे ९०० लोकांचा बळी घेतला असून, ४० हजारांहून अधिक लोकांना त्याची बाधा झाली असताना आता हे सगळे थांबणार कधी? हा विषाणू दोन आठवड्यांहून अधिक काळ निष्क्रिय राहतो. या कालावधीत विषाणबाधित व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या विषाणमळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असणे ही चांगली बाब असली, तरी तो पसरण्याचा धोका मोठा आहे.
हा हवेच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. त्याचा प्रसार रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे व्यक्तींना एकमेकांपासून दूर ठेवणे. जगात सर्वप्रथम २००३ मध्ये अशा प्रकारचा धोका समोर आला होता. त्यावेळी सीव्हिअर अॅक्यूट रेस्परेटरी सिंड्रोम म्हणजेच सार्स विषाणूंचा प्रसार मोठ्या वेगाने झाला होता. त्यावेळी जगाच्या एकंदर जीडीपीमध्ये चीनचा वाटा अवघा चार टक्के होता. आज हा वाटा सोळा टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरूनच चीनच्या अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्व ओळखायला हवे. जगभरात स्वस्त वस्तूंचा पुरवठा करणारी साखळी चीनमधूनच सुरू होते. त्यामुळे चीनमधील आरोग्य संकटामुळे संपूर्ण जगातील व्यवसायांवर परिणाम होतो. कोरोना विषाणू हा २००३ मध्ये पसरलेल्या सार्स विषाणंपेक्षा आणि २०१३ मध्ये पसरलेल्या मिडल ईस्ट रेस्परेटरी सिंड्रोमपेक्षा (मर्स) कितीतरी अधिक धोकादायक आहे.
या सर्व रुग्णांच्या बाबतीत वटवाघळामध्ये आढळून येणारा विषाणू प्राण्यांच्या मार्फत मानवी शरीरात आल्याचे आढळून आले आहे. सार्सच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) असे आढळून आले होते, की हा विषाणू रानमांजर, | रानटी कुत्री आणि तरसाच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात आला होता. कोरोना विषाणू मात्र माणसाच्या शरीरात नेमका कुठून आला, । हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी या विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली, तेथील स्थानिक बाजारात वटवाघळाची विक्री केली जात नाही, असे सांगितले जाते. शास्त्रज्ञ अद्याप या विषाणूचा स्रोत कोणताअसावा, यावर संशोधन करीत आहेत; मात्र प्राण्यांच्या शरीरातील विषाणू माणसांच्या शरीरात येण्याचे प्रमाण वाढले आहे, एवढे मात्र हमखास म्हणता येईल. या विषाणूंमध्ये स्वाइन फ्लूपासून एव्हिअन एन्फ्लुएन्झापर्यंतच्या अनेक विषाणूंचा समावेश आहे. हे सर्व असे आजार आहेत, जे प्राण्यांमधून सुरू होऊन माणसांमध्ये एका साथीच्या आजाराला जन्म देतात. प्रत्येक खाद्यपदार्थांमधून आपण रासायनिक पदार्थ आणि विषारी पदार्थ आपल्या जेवणात मिसळत चाललो आहोत. । त्यामुळेच खाद्यपदार्थ आपल्याला पोषण देण्याऐवजी आजार देऊ। लागले आहेत.
जनावरांनाच नव्हे, तर पिकांनाही प्रतिजैविकांचा डोस लागले आहेत. जनावरांनाच नव्हे, तर पिकांनाही प्रतिजैविकांचा दिला जात आहे. त्याचे कारण जनावरांचे आजार कमी करणे हे नसूनअधिकाधिक नफा मिळविण्याच्या हेतूने त्यांचे वजन वाढविणे हे यातून माणसांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहे. दुसरीकडे, आपण खाण्यापिण्याच्या सवयी अशा तबदलत आहोत, जेणेकरून त्या आपल्यामध्ये आजार पसरविण्यास कारणीभूत ठरतील. जनावरांच्या मांसावर मोठमोठ्या कारखान्यांमध्ये प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे जगभरात रोग-जंतूंचे संक्रमण वेगाने होत आहे. स्वाईन फ्लूची सुरुवात मेक्सिकोमध्ये डकराच्या मांसावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यापासून झाली होती, हे विसरता येणार नाही. माणूस आणि प्राण्यांच्याअधिवासातील अंतर संपुष्टात आल्यामुळे रोगांचा प्रसार यापुढेही मोठ्या वेगाने होणार आहे. आजारांपासून जल-वायू परिवर्तनापर्यंत अनेक बाबी जगाला आणखी कमकुवत बनवीत राहणार आहेत, हेच वास्तव आहे.
गेल्या तीन दशकांमध्ये जगाने अशा एकीकृत जागतिक व्यापारात गुंतवणूक वाढविली ज्यावर कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रीय नियंत्रणाला वाव नाही. विविधता हाच अस्तित्वाचा पाया आहे, हे गरिबांच्या जोखीम व्यवस्थापनाच्या व्यवस्थेतून आपण शिकायला हवे. पीक आणि पशुपालन यातून आपले शेतकरी कमीत कमी जोखीम स्वीकारतात. ते पूर्वी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत होते. त्यामुळे प्रगत राष्ट्रापुढे निसर्गावर होणाऱ्या प्रहाराची परतफोड निसर्गाचा श्राप म्हणून ही दुर्दैवी वेळ एक ना दिवस येणारच हेच यातुन दिसून येते.