मुंबई (प्रतिनिधी): जलसा हा कोकणातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रबोधनाचे माध्यम म्हणून प्रचलित असणारा सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा आजही सुरु असतांना या सांस्कृतिक प्रबोधनामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना संघठीत करुन त्यांच्या स्तुत्य कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक पातळीवर व मुंबईमध्ये वास्तव्य करणाऱ्या कलावंतांनी एकत्र येऊन यगंधर कला मंच संगमेश्वरची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. एक तालुका एक कलामंच कलामंच गांची पटलाची मीटिंग कलायचचे अध्ययाय गनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर ऐतिहासिक मीटिंगला तालुक्यातील अनेक दिग्गज कलावंतजलसाकार, नाटककार, कव्वाली गायक, नाटककार. कव्वाली गायक, ऑर्केस्टा सिंगर.अभिनयकार अनेक जण उपस्थित होते. तालुक्याचा सार्वभौम विचार करून संघटनेचे नाव युगंधर कला मंच संगमेश्वर तालुका. ते ठरवण्यात आलेमीटिगमध्ये झाल मीटिंगमध्ये झालेले विषय हे प्रत्येक तरुण किंवा वयोवृद्ध कलावंताला पुन्हा संजीवनी देणारे होते. तालुक्यातील कलावंत प्रत्येक गोष्टीला सक्षमआहे. फक्त संघटित नव्हते. या मंचाच्या माध्यमातुन आताअसे संघटन बनले आहे की ते वैचारिक आणि सामाजिक बाजूनी नटलेले आहे. यावेळी जेष्ठ साहित्यीक, शिक्षक, कवी नाटककार आयु. मनोज जाधव सर सर यांना साहित्यरत्न हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला
तसेच उत्कृष्ठ नाट्य लेखक म्हणून ज्यांना नुकताच पुरस्कार मिळाला ते प्रकाश पवार, तुरळ यांचासुद्धा कलामंचाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. मीटिंगसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि सर्वतोपरी सहकार्य दर्शविल्याबद्दल जेष्ठ कवी जलसाकार पांडुरंग कदम, गाव सायले यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सदर मिटिंगला २२ गावचे कालावंत उपस्थित होते. सर्वानी आपले मनोगत व्यक्त करुन विविध विषयावर मार्गदर्शन केले येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये कला मंचाच्या उदघाटन प्रसंगी आपल्याच तालुक्यातील कलावंताचा दामोदर हॉल परळ या ठिकाणी कार्यक्रम होणार असून त्यासाठी प्रथम धम्मदान म्हणून ५०,००० रु. धम्मदाते संतोष जाधव लोवलेकर यांनी दिले. त्यानंतर कार्यक्रमासाठी जो तिकिट खर्च लागेल तो सर्वतोपरी सुप्रसिद्ध गायक अभिनयकार विक्रांत मोहिते करणार असल्याचे जाहिर केले. या कलामंचाच्या वतीने कलावंतांना योग्य दिशा देण्याचे काम होईल व सर्व कलाकारांना एक नवा मंच उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली उपस्थितांचे आभार मानन आणि अध्यक्षीय भाषण झाले आणि सरचिटणीस संतोष गमरे यांनी मीटिंगचा समारोप केला.