...हा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य सरकार


मुंबई : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केला. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारा निर्णय घेणारे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार देशातील हे एकमेव राज्य सरकार आहे. 


कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात राज्य सरकार नागरिकांच्या हिताचे अनेक योजना आणण्याचा प्रयत्न करत असतांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण मिळणार आहे. या पूर्वी या योजनेचा लाभ फक्त बीपीएल व केशरी लाभार्थी रेशनकार्डधारक यानाचा लाभ मिळत होता. हा निर्णय राज्यातील नागरिकांना दिलासादायक असून यांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे राबविण्यात यावी हिच नागरिकांची अपेक्षा.