आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मोफत होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या कामगार, मजूर, बेघर व्यक्ती, पर्यटक व इतर व्यक्ती अश्या व्यक्तिंनी महानगरपालिकेने विहीत केलेल्या नमुन्यात पूर्ण अर्ज, भरुन त्याबरोबर आधार कार्डची छायांकित प्रत समाविष्ट करुन वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. त्यामुळे खाजगी डॉटरांकडे रांगा लागत होत्या त्यात काही ठिकाणी डॉटर या लोकांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी ही वाढत होत्या तसेच आरोग्य तपासणी न करताही वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे प्रकार घडत होते त्या प्राश्वभूमीवर आता आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेले वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. शासकीय तसेच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचा निर्णय काळ मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यामुळे आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.