कोरोनाच्या लढाईत राज्यातील पोलीस वीरांचे मोलाचे योगदान, ७ पोलीस वीरांना कोरोना मुळे गमवावा लागला जीव


मुंबई : लोकडाऊन काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या विरोधातील लढाईत पोलिसांनी मोलाचे योगदान दिले आहे आणि देतही आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत राज्यात कलम १८८ नुसार १ लाख १ हजार ३१६ गुन्हे, १९ हजार ५१३ व्यक्तींना अटक, अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे, ५५ हजार ६५० वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद, विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल, अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख ९८ हजार ३३८ पासचे वितरण, पोलिसांवर हल्ल्याच्या २०० घटना यातील ७३२ आरोपींना अटक, #Dial100 वर आलेल्या ८७ हजार ८९३ कॉल्सची योग्य दखल घेऊन कारवाई करण्यात आली. 


कोरोनाचा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील २४ तास कार्यरत असतांना पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या मध्ये ७५ पोलीस अधिकारी, ६२८ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत तर मुंबई ४,पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ७ पोलीस वीरांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.