मिरा भाईंदर मधील जे आपापल्या राज्यात किंवा जिल्ह्यात परत जाण्याऱ्या इच्छुकांसाठी महत्वाची बातमी

भाईंदर : शासन आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणुचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंमलात आणलेल्या लॉकडाऊनच्या
कालावधीत इतर राज्यातील / महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अडकलेले कामगार, मजूर, बेघर व्यक्ती, पर्यटक व इतर व्यक्ती यापैकी जे आपापल्या राज्यात किंवा जिल्ह्यात परत जाण्यास इच्छुक आहेत, अश्या व्यक्तिंनी स्वत:ची तपशिलवार माहिती https://covid19.mhpolice.in या लिंक वरच online माहिती भरावी व सोबत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टर) यांचेकडून शीतज्वर (एन्फ़लूएंझा) ची लक्षणे नसल्याबाबतचे ‘वैद्यकीय प्रमाणपत्र’ जोडावे.


यासंबंधाने महानगरपालिकेच्या दवाखान्यातून/क्लिनिक मधून अथवा खाजगी नोंदणीकृत डॉक्टरांनी (R.M.P) दिलेले ‘वैद्यकीय प्रमाणपत्र’ ग्राह्य धरण्यात येईल. यानंतर जिल्ह्याधिकारी कार्यालयामध्ये या भरण्यात आलेल्या माहितीची तपासणी होऊन शहरातील Containment Zone बाहेरील संबंधित व्यक्तीस online पध्दतीद्वारे e-pass देण्यात येईल. अश्या e-pass प्राप्त व्यक्ती खाजगी वाहने उदा. कार, जिप, बस इ.द्वारे Social Distancing तत्वाचा अवलंब करून त्यांच्या इच्छीत स्थळी (परराज्य/ परजिल्हा) जाऊ शकतात. परराज्यातील एकाच
जिल्ह्यात जाणा-या अश्या e-pass धारक व्यक्तींची संख्या 1200 असेल व ते रेल्वेने जाण्यास इच्छूक असतील, तर अश्या व्यक्तिंसाठी रेल्वेची सोय करण्यात येईल. (मात्र प्रवासाचा खर्च संबंधित व्यक्तींना करावा लागेल.) याबाबत कोणत्याही प्रकारचा छापिल फ़ॉर्म भरण्यात येवू नये. फ़क्त https://covid19.mhpolice.in या लिंकवर online पध्दतीद्वारेच माहिती भरण्यात यावी, असे आवाहन मा.आयुक्त यांच्यावतीने मिरा भाईंदर क्षेत्रातील
सर्व नागरीकांना एका प्रसिद्धी पत्राद्वारे करण्यात आले आहे.