कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना 'मांझी फाउंडेशनच्या' वतीने निवारा हक्क मार्फत 1770 PPE किटचे वाटप


मुंबई : कोरोना सारख्या महामारी विरुद्ध काम करताना मुंबई विभागातील सायन, नायर, कूपर, होली स्पिरिट रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना 1770 PPE किट (Personal Protective Equipments) तसेच फेस सिल्डचे वाटप मांझी फाउंडेशनच्या वतीने निवारा हक्क सुरक्षा समिती मार्फत करण्यात आले.


देशात कोरोनाचा मोठया प्रमाणावर फैलाव होत असून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनासी लढण्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांना PPE किटची अत्याधिक गरज असून त्याचा पुरवठा होत नसल्याने रुग्णालय कर्मचारी आहे त्या अवस्थेत लोकांची सेवा करीत आहे, परिणामी अनेक रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ही बाब लक्षात घेऊन मांझी फाउंडेशनच्या सीमा बक्षी यांनी बंगलोरस्तीत कंपनीशी संपर्क साधून PPE किट आणि फेस सिल्ड देण्याबत विनंती केली. त्यानुसार नायर, लोकमान्य टिळक सायन, कूपर आणि होली स्पिरिट रुग्णालय येथे तेथील डीन, प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना एकूण 1770 PPE किट आणि फेस सिल्ड साहित्य देण्यात आले. सर्व डॉक्टर यांनी विशेष आभार मानले. आणखी 3000 हजार किट चे वाटप पुढील काही दिवसात करण्यात येणार आहे असे यांचे संयोजन व व्यवस्थापन करणारे निवाराचे संजय डावरे यांनी सांगितले.


किट सर्व रुग्णालयात पोहचवण्यासाठी रावण गायकवाड व कृष्णा राठोड यांनी विशेष मेहनत घेतली. निवाराच्या अनिता जाधव, अनंत जोशी, वसंत खाडे, प्रकाश शिंदे, डी. एम. माणिक शिंदे, माणिक गाडेकर, मोरे, सुरेश शिंदे यांनी विशेष योगदान दिले.